Maharashtra rain ; राज्यातील या भागात पावसाची शक्यता, या भागात उघडीप

Maharashtra rain ; राज्यातील या भागात पावसाची शक्यता, या भागात उघडीप

Maharashtra rain ; राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. मात्र पावसाचा जोर कमीच आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. मात्र १२ सप्टेंबरनंतरच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

 

हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यत ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain: राज्यात पावसाची उघडीप शक्य तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली,नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रतील सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Rain Forecast Maharashtra : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता
शुक्रवार आणि शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही या दोन्ही दिवस सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधारेची शक्यता आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तसेच शनिवारी कोकणातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Leave a Comment