परतीचा पाऊस ; मान्सूनचा परतीचा प्रवास कधी पासून सुरू होणार…

परतीचा पाऊस ; मान्सूनचा परतीचा प्रवास कधी पासून सुरू होणार…

परतीचा पाऊस ; सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज, सप्टेंबरमध्ये काही ठिकाणी कमी पाऊस असला तरी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील २१ प्रमुख कृषी जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस होईल. आठवड्यानुसार हवामान: सप्टेंबर महिन्याचा आठवड्यानुसार अंदाज. ८ ते १२ सप्टेंबर दरम्यान थोडा कोरडा काळ असेल, पण १३ ते १८ सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस अपेक्षित आहे. हा काळ रब्बी पिकांसाठी महत्त्वाचा आहे.

मान्सूनची माघार: मान्सूनची माघार घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राजस्थानातून १७ सप्टेंबरच्या आसपास माघार सुरू होते. देशातून पूर्ण माघार घेण्यासाठी महिना लागतो.
शेतकऱ्यांसाठी पिकांचे नियोजन कसे करावे यासाठी मार्गदर्शन. कांद्याची लागवड सप्टेंबरच्या शेवटी ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत होते. सोयाबीनची काढणी सप्टेंबरच्या शेवटी तर भात आणि कापसाची काढणी ऑक्टोबरमध्ये होईल.

रब्बी हंगामाचा अंदाज ; आधीच्या चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता चांगली आहे. अपेक्षित थंड हवामान देखील पिकांसाठी फायदेशीर ठरेल. सप्टेंबर महिन्यात देशात आणि राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. मग राज्यात कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडेल? ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण कसे राहील? माॅन्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून सुरु होईल? याची माहिती तुम्हाला आजच्या मुलाखतीमधून मिळेल.

Leave a Comment