लाडकी बहिण योजना ; महिलांना खुशखबरः 3000 ₹ एकदाच मिळणार आदिती तटकरे
लाडकी बहिण योजना ; महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. जून २०२४ पासून ही योजना सुरु केली असून आतापर्यंत जुलै २०२५ पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
मात्र सप्टेंबर महिना सुरु झाला असूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही. यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला असताना याबाबत आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता पहिला आठवडा उलटला तरी महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु याबाबत, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल, असे सांगितले आहे.
त्याचबरोबर, सरकारचा लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरु ठेवण्याचा संकल्प आहे. या योजनेचा जो काही लाभ आहे तो अशाचप्रकारे सुरु राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. असेही आदिती तटकरे यांनी म्हटले. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता म्हणजेच ३००० रुपये एकत्र येणार का? असाही प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
२१०० रुपये कधी मिळणार?
२१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला असता, जाहिरनामा हा पाच वर्षांसाठी असतो. आम्ही जाहिरनाम्यात २१०० रुपयांचं आश्वासन दिलं होते. ते आम्ही नक्कीच पूर्ण करु. पण, सध्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ नियमितपणे पोहोचणे याला सरकारचं प्राधान्य आहे. योग्य वेळी २१०० रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना पोहोचेल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.