परतीचा पाऊस ; मान्सून परतीचा पाऊस ऑक्टोबर पर्यंत लांबणार

परतीचा पाऊस ; मान्सून परतीचा पाऊस ऑक्टोबर पर्यंत लांबणार – ईशान्य मान्सून (परतीचा मान्सून)

राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस थांबला आहे. ईशान्य भारतात वातावरणाचा दाब जास्त आणि ईशान्येकडील वाऱ्यांमुळे आसाममध्ये मान्सून सुरू झाला आहे. शुक्रवार आणि शनिवारी पूर्व महाराष्ट्रात परतीचा मान्सून सुरू होईल, ज्यामुळे जोरदार वारे, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल.

 

सूर्याच्या दक्षिणायनामुळे परतीचा मान्सून येतो, ज्यामुळे वातावरण तापते, हवेचा दाब कमी होतो, ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. महाराष्ट्रात मान्सून परतण्याचा कालावधी 12/15 ऑक्टोबर असतो, परंतु यावर्षी पॅसिफिक महासागरातील तापमानामुळे तो लांबण्याची शक्यता आहे. मान्सूनोत्तर पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत आणि नोव्हेंबरमध्येही सुरू राहण्याची शक्यता आहे .

Leave a Comment