पंजाब डख लाईव्ह ; 13/सप्टेंबर पर्यंत उघडीप पण… पुन्हा मुसळधार
पंजाब डख लाईव्ह ; सप्टेंबर 8 पासून, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या भागात 8 सप्टेंबरपासून चांगले ऊन पडेल आणि 9, 10, 11, 12, आणि 13 तारखेला त्याची तीव्रता वाढेल. 13 सप्टेंबरपर्यंत या भागातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे.
राज्याच्या इतर भागात पावसाचा अंदाज – पंजाब डख
उत्तर महाराष्ट्रात जरी हवामान कोरडे राहणार असले, तरी राज्याच्या इतर भागात पाऊस सुरूच राहील. 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस अपेक्षित आहे.
14 ते 20 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस – पंजाब डख
14 ते 20 सप्टेंबर दरम्यान, संपूर्ण राज्यात, विशेषतः पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खान्देश आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर, लातूर, बीड, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा आणि कोकण किनारपट्टी या दक्षिण महाराष्ट्रातील भागांमध्ये पावसाची तीव्रता अधिक असेल.
अहमदनगर जिल्ह्यात 11 ते 12 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस अपेक्षित आहे, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. तसेच, टाकळी ढोकेश्वर, बेळ पिंपळगाव, उमापूर, बालाम टाकळी, कोपरगाव आणि शिर्डी यांसारख्या ज्या गावांमध्ये यापूर्वी कमी पाऊस झाला होता, तेथे 12 ते 20 सप्टेंबर दरम्यान पाऊस अपेक्षित आहे.
शेजारच्या राज्यांमध्ये पावसाची स्थिती गुजरातमध्ये 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस अपेक्षित आहे. त्याचबरोबर, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येही 10 सप्टेंबरपासून जोरदार पाऊस होईल, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सीमाभागातील नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांमधील हवामानावर परिणाम होईल.